वैचारिक लेखन
शेतकरी नवरा नको ग बाई !
जहाँ डाल डाल पर
सोने की चिडीयाँ करती है बसेरा
वो भारत देश है मेरा ।
इंग्रज भारतात येण्यापुर्वी भारत हा 'सुजलाम् सुफलाम्' देश होता . असे म्हणतात घराघरात दुधाच्या नद्या वाहत असत . गरिबातील गरीब शेतकरी धनधान्याने सम्रुध्द होता . घरात सुखशांती होती ,सगळ्याच बाबतीत समाधानी होती . त्या काळात 90% उपजीविका शेतीव्यवसायावर आधारित होती फक्त10% नोकरदार वर्ग त्या काळी होता .
काळ बदलला आणि त्याबरोबर वैज्ञानिक प्रगती होत गेली हळूहळू वातावरणात प्रदूषण वाढत गेले . त्यामुळे पावसाची अनियमितता वाढत गेली . त्यामुळे शेती व्यवसायात हवे तसे यश मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे . काही सुशिक्षित शेतकरी वर्ग नोकरी शोधण्यासाठी शहराकडे वळताना दिसतो . पण पुरेसे शिक्षण नसल्याने कमी पगाराची नोकरीतच समाधान मानावे लागते . तुटपुंज्या कमाईत शहारात महागाईला.तोंड देता येत नाही . मग पाऊले पुन्हा गावाकडे ओढू लागतात . शेतीत पुन्हा पेरणी करण्याचा निर्णय घेतला जातो . मग सुरु होते कर्जाची वाढती यादी , दागिने ,घर ,जमीन सर्वच हळूहळू गहाण ठेवले जाते . कारण महागाई च्या काळात बियांपासून ते पिक घरात येईपर्यंत शेतकर्यांना पैशांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येते . पीक बाजारात विक्रीसाठी आणले तर हामी भाव मिळेलच असे नाही . जो भाव मिळतो त्या भावात पिक विकून द्यावे लागते कारण कर्जाच्या हप्त्यात्यांचा डोंगर डोक्यावर असतो . त्यात घरखर्च मुलाबाळांच्या शिक्षणाचा ही प्रश्न असतोच . आजचा प्रत्येक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली जगतोय . शेती करताना शरिराला झालेला त्रास तो हसत हसत सहन करतो पण सततच्या कर्जबाजारीपणाचा मानसिक त्रास सहनकरण्याची त्याची शक्ती लोप पावत चाललेली आहे . सततचा दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे त्याच्या पदरी नैराश्यच पडत आहे .म्हणूनच प्रत्येक शेतकरी पिता आपल्या मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी धडपडत असतो ,किमान माझे मुलं तरी पुढे जाऊन उच्च पदावर नोकरी करतील आणि आम्हाला सुखाचे दिवस येतील . त्यासाठी तो रात्रंदिवस शेतात राबतो . पण नोकर्या कमी असलेल्या बेरोजगारी जास्तच वाढतचालली आहे . त्यामुळे तिथेही त्याला यश मिळतच असं नाही . म्हणूनच प्रत्येक वधू पिता आपल्या मुलीला शेतकरी वर शोधण्याचे टाळतो . कितीही पैसा खर्च झाला तर चालेल पण मुलगा नोकरीला हवा ,मग तो सरकारी नोकरीत शिपाई असला तरी चालतो .त्या साठी शेतकरी वधूपिता कितीही कर्ज काढायला तयार होतो . मात्र शेतकरी मुलाला मुलगी देत नाही . याचा परिणाम म्हणजे शेतकरी मुलांचे लग्नच होत नाही ही सध्याची सत्य परिस्थिती आहे . आज प्रत्येकखेडेगावात 60%शेतकरी मुलांचे लग्नच जमत नाही . अगदी विना हुंडा आणि लग्न खर्च स्वतः करायला तयार असलेले शेतकरी वर पिता आपल्या मुलासाठी वधू शोधून शोधून थकलेत . आज खेडोपाड्यातील घराघरात ग्रुहलक्ष्मी मिळत नाही. याला कारण एकच मुलगा शेती करतो .
सुशिक्षित असो वा अल्पशिक्षित सर्वच मुली शेतकरी वराचे स्थळ नाकारतात . लग्नाचा निर्णय मुली व्यवहारिक द्रुष्टीकोनातुन घेतात . लग्न जोडताना गडगंज पगारदार किंवा मोठा व्यापारी याला पहिली पसंत देतात आणि भरमसाठ हुंडा देऊ वधूपिता आपल्या मुलीचे लग्न लावून देतात . कालांतराने गडगंज पगारदार जवाई व्यसनी असल्याचे कळते .
आणि आपण आपल्या मुली साठी सुखी संसाराचे पहिलेले स्वप्न भंगून जाते . काही ठिकाणी हुंड्यासाठी त्रास दिला जातो .
मग आठवण येते पलिकडच्या गावातील शेतकरी मुलाचे स्थळच चांगले होते .पैसे कमी होते पण माणुसकीचा साठा अमाप होता .
लग्नाचा जोडीदार निवडताना पैसा नाही माणुसकीला प्राधान्य दिले तर हि वेळ कोणत्याही वधू पित्यावर आणि वधूवर येणार नाही .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा