सुन्या सुन्या अंगणात

ु   

     सकाळचे सहा वाजले होते . सुमित्रा घाई घाईत निघाली . तितक्यात मागून आवाज आला सुमा सावकाश हो , आई ,"उशीर होतोय समीर गाडील जाऊन बसलेत ". असं म्हणत तीने खांद्यावर पर्स अडकवली. समीरच्या आईने तिच्या हातात अस्थिकलश देत म्हटलं , पोरी सांभाळून जा. हा कलश मांडीवर धर कुठेही खाली ठेवू नकोस . सुमित्राने भरल्या डोळ्यांनी मानेनेनीच होकार दिला . सुमित्रा घाईतच जिना उतरु लागली . खाली गाडीत समीर बसलेलाच होता . एका हातानं गाडीचं दार उघडत म्हणाला ,किती उशीर ! आपल्याला संध्याकाळ पर्यंत परत यायचे आहे ना . उद्या अॉफिसात हजर राहवे लागेल दोघांना . दोघेही उच्च पदावर कार्यरत होते . समीरने गाडी स्टार्ट केली . गाडी कल्याणहून हळूळू नाशिक च्या दिशेने पुढे जाऊ लागली . वाहनांनी भरगच्च भरलेल्या रस्त्याने गाडी वाट काढत हळूहळू नाशिकच्या दिशेने पुढे जाऊ लागली. सुमित्राच्या मनात आठवांचे काहूर दाटून आले . तिच्या आणि समीरच्या मनात नकळत घर करुन राहिलेल्या  लक्ष्मी मावशींना जाऊन आज सव्वा महिना झाला होता . लक्ष्मी मावशींची शेवटची ईच्छा होती त्यांच्या अस्थि त्यांच्या शेतातच पुराव्यात .त्यांच्या ईच्छेनुसार त्यांच्या 'हिसवाळ' या गावी दोघेजण निघाले. हिसवाळ म्हणजे सुमित्राचे आजोळ . नाशिकपासून थोड्याच अंतरावर वसलेलं छोटंसं गाव
सुमित्रा चे आजोबा गावातील श्रीमंत जमीनदार होते .पाचशे एकर जमिनीचे मालक शिवाय त्यांनी गावात दुध डेअरी सुरु केली  होती गावातून सर्व दुध एकत्र करुन मुंबई कडे विक्री साठी येत होते त्यामुळे गावातील गोरगरिबांना रोजगाराचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले होते। सुमित्राच्या आजोबांना गावकरी मोठ्या मानाने काकासाहेब म्हणत .जमीन मळा बागायती असल्याने घरात सर्वत्र भरभराट होती .लक्ष्मी काकासहेबांच्या घरगड्याची मुलगी जन्मताच तीच्या आईचा मृत्यु झाला . पोरं आईच्या मायेला पारखी झाली . काकासाहेबांच्या वाड्यावर सुमित्राच्या आजीच्या मायेच्या पंखाची उब तिला मिळाली . लक्ष्मी खुप सुंदर आणी गुणवान ,प्रेमळ होती आपल्या समजुतदार स्वभावाने तिने सर्वांना आपलसं केलं होतं .  लक्ष्मी पंधरासोळा वर्षाची असतांना तिच्या वडिलांचा सर्पदंशाने मृत्यू झाला .काकासाहेबांनी तिला परकेपणाची जाणिव होऊ दिली नाही वयात आल्यावर नारायण नावाच्या गुणवान मुलाशी तिचं लग्न लावून दिले .स्वतः तिचे कन्यादान केले . कन्यादानात आंदण म्हणून दोन एकर जमीन तिच्या नावे केली . मळ्यातच लक्ष्मी नारायणाचा संसार फुलला . लक्ष्मी मुळातच रुपवान होती कपाळावरचं लालबुंद कुंकू तिचं रुप आणखी खुलवतं होतं . हातभर हिरवा चुडा तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता . मळ्यातच त्यांनी मातीचं छोटसं घरं बांधलं होतं . दारात आंब्याची तीन चार झाडे लावली होती . सडा रांगोळीनं लक्ष्मीचं अंगण नेहमीच सजलेलं असे . लक्ष्मी नारायणाच्या संसारवेलीवर छानशी कळी उमलली केतकी . दोघांचा संसार सुखात चालू होता . सुमित्रा सुट्टीत आओळी आली की लक्ष्मी मावशींच्या मळ्यात केतकी सोबतच खेळत असे . केतकीची आणी सुमित्राची छान मैत्री जमली होती . आंब्याच्या झाडाला झोके बांधून दोघी दिवसभर खेळत असतं . लक्ष्मी मावशीच्या हातची कळण्याची भाकरी आणी वाटलेली ओल्या लसणाची चटणी सुमित्राचा आवडता मेनू . सुमित्राला लक्ष्मी मावशीचा आणि केतकीचा लळा लागला होता . सुट्टीत आजोळी आली की ती लक्ष्मी मावशीच्याच घरी राहत असे . दिवसा मागून दिवस जात होते सुमित्रा आता मोठी झाली. शिक्षणाच्या निमित्ताने सुमित्रा व्यस्त राहू लागली . आजोबा गेल्याची बातमी समजली  आई बाबां सोबत सुमित्रा आजोळी आली. अंत्यविधी आटपून सर्व जायला निघाले . सुमित्राने आईला सांगितले मी लक्ष्मी मावशी आणि केतकीला भेटून येते . आईने मानेनेच होकार दिला . सुमित्राला समोर पाहून लक्ष्मी मावशींना खुप आनंद झाला . केतकीला आवाज दिला व सांगितले गं पोरी बघं कोण आलयं भेटाया ! केतकी धावतच आली मळ्यातूंन कोण सुमा का !आणि तीनं सुमा ला घट्ट मीठी च मारली . लक्ष्मी मावशी म्हणाल्या बस पोरी दोन घास खाऊन जा . नको मावशी उशीर होईल सर्वजण वाट बघत आहेत माझी . राहू दे माझं नाव सांग काही बोलणार नाही कोणी तुला . लक्ष्मी मावशीनं घाईघाईत चुल पेटवली आणि कढई चुलीवर ठेवली . बसं आत्ता होतोय बघ गुळ तेलाचा शिरा, लगेच करते . गुळतेलाचा शिरा घेऊन लक्ष्मी मावशी अंगणात आली सुमित्रा आणि केतकी बाहेरचं अंगणात पलंगावर बसल्या होत्या .  हातातीलघड्यळ्या कडे पहातपहात सुमित्राने  शिरा  संपवला. लक्ष्मी मावशी शिरा खुप छान झालाय . जास्तिचा असेल तर बांधून दे सर्वांना देईन थोडा थोडा . हो पोरी घेऊन जा. असं म्हणत लक्ष्मीन एका डब्यात शिरा आणला . सुमित्राने त्यांचा निरोप घेतला . नंतर खुप वर्ष झाली सुमित्रा आजोळी गेली नाही . सुमीत्राचं लग्न समीरशी झालं समीर खुप समंजस मुलगा होता . आपल्या आई सोबत तो राहत होता . सुमित्रा आणि समीर बँकेत उच्च पदावर कार्यरत होते . दोघांना एक पाच वर्षाचा मुलगा होता .
मामाच्या मुलाचं लग्न ठरलं सुमित्रा व तिच्या घरच्या मंडळींना बोलावणं आलं . सुमित्राला खुप आनंद झाला होता . खुप दिवसांनी लक्ष्मी मावशी व केतकीला भेटण्याचा योग आला होता तिनं लक्ष्मी मावशी साठी हिरवा चुडा घेतला व केतकीला छानशी साडी घेतली . आपल्या परिवारासह सुमित्रा मामे भावाच्या लग्ना साठी आजोळी आली.  थोडावेळ लग्न घरात थांबून  तिच्या सासू बाईं सोबत लक्ष्मी मावशींना भेटण्यासाठी आली. गाडीतून खाली उतरली लक्ष्मी  मावशी साठी आणलेला  चुडा हातात    घेतला आणि केतकी साठी आणलेली साडी घेतली . गाडीतून उतरतांनाच केतकी , मावशी असा आवाज देऊ लागली . लक्ष्मी मावशी पाठमोर्या बसुन त्यांचं लुगडं धुवतं होत्या सुमित्रा चा आवाज ऐकून त्या तिथून उठल्या आणि तिथूनच पाहू लागल्या कोण आहे ?  मावशी मी सुमित्रा ! सुमित्रा समोर आली आणि समोरचं पलटलेलं चित्र पाहून थक्कच झाली. कपाळावर ते रेखलेलं लालबुंद कुंकू नव्हतं हातभर हिरवा चुडा नव्हता . सुमित्राला समोर पाहून लक्ष्मीला धसधस रडूं कोसळलं . लक्ष्मी सुमित्राच्या गळ्यात पडून धसधस रडू लागली . सुमित्राच्या हातातील लक्ष्मी साठी आणलेला चुडा सरसर खाली गळुन पडला . सुमित्राला ही रडु कोसळलं .कसं झालं गं मावशी हे सर्व मला कोणीच कसं सांगितलं नाही ! पोरी तुझ्या काकाच्या गाडीला अपघात झाला त्यात त्यांचा जीव गेला . कधी झालं ? सुमित्राने विचारलं  दोन वर्ष झालेल पोरी आता . आणि केतकी कुठंय ती पण दिसत नाही सुमित्राने विचारले . केतकीचं नाव घेताच लक्ष्मीला आणखी जास्त रडू कोसळलं केतकीला हुंड्यासाठी जाळलं पोरी , माझी सोन्यासारखी लेक जाळून टाकली त्या नराधमांनं . लक्ष्मी रडतडच सांगू लागली लक्ष्मीच्या अंगात ताप होता सुमित्रानं तिला बाहेरच टाकलेल्या पलंगावर बसवले . आणि तिला माठातून पाणी दिले तिचं सांत्वन करु लागली समीरच्या आईंनी पण त्यांना शांत केले लक्ष्मी तापाने फणफणत होती . समीरच्या आई म्हणाल्या सुमा , "ह्यांना आपल्या सोबतच घेऊन जाऊ या  इथं कोणी ही नाही त्यांची काळजी घ्यायला . "  लग्न.आटपून सर्वजण.आपापल्या घरी जायला निघाले . समीरच्या आईने सुमित्राच्या लक्ष्मी मावशींबद्दल  समीरला सांगितले . समीर म्हणाला त्यांना आपल्या सोबतच राहू देऊ . आई तुला ही  सोबत होईल त्यांची आम्ही दोघे कामानिमित्त दिवसभर बाहेरच असतो . सुमित्रा म्हणाली होती लक्ष्मी मावशींचा स्वभाव खुप छान आहे . सर्वांच्या सहमताने लक्ष्मी मावशींनां कल्याणला आणले . त्यांना डॉक्टर कडे नेऊन त्याच्यावर उपचार केले . बराच काळ आनंदात गेला. एक दिवस लक्ष्मी सुमित्राला म्हणाली पोरी हे जमीनीचे कागदपत्र आहेत . वकीलाला बोलावून आण मला ति जमीन तुझ्या नावे करायची आहे . का गं मावशी मला कशाला देतेय तु जमीन मला नकोय मावशी  तुझं काही सुमित्रा म्हणाली . राहू दे तुला , सुमित्रा थोडं रागावून बोलली . पोरी , माझी केतकी गेली तु पण माझी केतकीच हाय गं पोरी.,लक्ष्मी सुमित्राच्या डोक्यावरुन हाथ फिरवत म्हणाली . माझं काही खरं नाही बघं आता देवा घरचं बोलवण कधी येत ईल सांगता येत नाही पोरी , मी गेल्यावर माझ्या पोरीचा जीव घेणारे नराधम वारस लागतील जमीनीला  मला जमीन द्यायची नाय बघं त्या हरामखोरांना , माझ्या पोरीचा जीव घेतला मेल्यांनी मी मेल्यावर लगेच टपकतील जमीनवर नाही ,पोरी मला तसं नाही होऊ द्यायचयं , तु आजच वकील बोलावून घे ,  लक्ष्मी नं हट्टच केला . सुमित्रानं सांगितले  आपण शनिवारी बोलावून घेऊ आम्ही सर्वजण घरी असू तेव्हा . लक्ष्मीला ऐकून समाधान वाटले तिनं होकार दिला . शनिवारी वकील घरी आले सर्व.लक्ष्मीच्या मनाप्रमाणं झालं. सोमवारी अॉफिसात जायची तयारी चालू होती . सुमित्रा आणि समीर चहा घेत होते ।तेवढ्यात आईंचा आवाज आला . समीर ,सुमा इकडे या लक्ष्मी बघ कशी करतेय . सुमित्रानं चहाचा कप तसाच खाली ठेवले वला तसांच ठेवला . धावतच आली "काय झालं मावशीला ? " सुमित्रा बोलतचं होती तेवढ्यात मावशीनं तिच्या डोक्यावरुन हात फिरवला म्हणाली "जाते पोरी आता . माझ्या अस्थि शेतातच पुर बरं कुठं टाकू नको ." समीर म्हणाला डॉक्टरला बोलवलय येत आहेत लगेच .मावशी म्हणाली ,"नको बाळ माझी वेळ आली जवळ आता जाते मी "
काही क्षणातच मावशी  सुन्न झाली . सुमित्राच्या डोळ्यासमोरुन सर्व चित्र एका पाठोपाठ तसेच्यातसे फिरत होते . गाडी थांबली सुमित्रा भानावर आली . गाडी शेतातच येऊन थांबली . सुमित्रा हातात कलश घेऊनगाडीतून खाली उतरली . समोर जिर्ण आणि सुन्न झालेली लक्ष्मी मावशीची झोपडी होती सावली हरवलेली आंब्याची झाडे ओसाड झालेली होती . रांगोळीने सजलेलं असणारं अंगण भंग होऊन लक्ष्मीची जणू वाट पाहत होतं
सारं कसं सुन्न भकास भासत होतं . त्यांत प्राण भरणारी लक्ष्मी आता राहिली नव्हती . सुनं सुनं रानं जणू ति सोडून गेल्यावर अकांत करत होतं., सारे जणू सुमित्राला विचारत होते , "कुठंय आमची मायं ,कुठंय आमची लक्ष्मी " . समीरने खड्डा केला त्यात अस्थि कलश ठेवला वर माती टाकली . दोघांनी लक्ष्मीच्या आत्म्यास शाती लाभो अशा मनोमन प्रार्थना केली . समीर गाडीत बसला . सुमित्राने जड अंतकरणाने गाडीत पाय ठेवला
गाडी कल्याणच्या दिशेने निघाली .

✍🏻 सौ. सुवर्णा सोनवणे .
चाळीसगांव

टिप्पण्या