वैचारिक चिंतन
व्यसनाधीनता ---- मृत्यु चे प्रवेशद्वार !
'सुख केवढं केवढं जसा राईचा दाना , दुःख केवढं केवढं त्यात आभाळ मावेना'.
कवितेच्या ह्या ओळी खरोखरच आजच्या समाजातील परिस्थितीची जाणीव करून देतात.
वाढता ताणतणाव तर आजच्या काळातील सर्वसामान्य बाब झालेली आहे. मोल मजुरी करणारा असो वा मध्यमवर्गिय असो वा श्रीमंत घरातील असो . लहान असो वा तरुण असो वा जेष्ठ असो सर्वच जण मानसिक तणावा खाली जीवन जगता आहेत .आजच्या संगणकीय युगात माणसा माणसात होणारा संवाद आता फारच विरळ आणि व्यवहारिक होत चालला आहे . माया प्रेम आपुलकीचे नाते आता फक्त स्वार्थासाठी आणि व्यवहारासाठी उरले आहे. दिवसभरात एकमेकांशी दोन शब्द बोलायला किंवा कोणाचे दोन शब्द ऐकायला लोकांजवळ वेळ नाही . पैसा धनसंपत्तीच्या मागे धावणार्या लोकांना नाते जपण्यासाठी वेळ नाही किंवा नाते फक्त व्यवहाराठीच उरले आहे. फक्त कामापुरते आणि आपल्या फायद्याचेच बोलणे एवढाच संवाद आता उरला आहे . मला समजून घेणारे कोणीच नाही अशी भावना लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात रूळत आहे. सर्वांनाच आपले दुःख डोंगरा एवढे वाटत आहे .सर्वच जण सांत्वनाचे - प्रेमाचे - मायेचे भुकेले आहेत. ह्याचा परिणाम म्हणून जगात आज लाखो तरुण वाईट संगतीत फसतात आणि लोक विविध प्रकारच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकतात.
हा एक असा विळखा आहे ज्यात अडकणे सोपे असते पण त्यातून बाहेर पडणे खुप कठीण असते . व्यसन रूपी विष माणसाला आतून शरीर पोखरत असतं .ज्यावेळी हे लक्षात येते तेव्हा खुप उशीर झालेला असतो .
व्यसनाधीनता म्हणजे एखाद्या पदार्थाच्या संपूर्णपणे आहारी जाणे त्याशिवाय जगणे अशक्यच असणे ही संकल्पना मनात खोलवर रुजणे.'
व्यसनांचे सात प्रकारात विभाजन होते . कोणते आपण आधी ते पाहू.
1) केना बिस इन्डिका -- ह्या प्रकारात भांग , चरस , गांजा ,इ. चा समावेश होतो .
ह्या पदार्थांचे सेवन केल्याने त्या व्यक्तीला काही वेळेसाठी प्रसन्नचित्त किंवा हलकेपणाची अनुभुती होत असते. तेवढ्या वेळेतच ती व्यक्ती व्यसनाच्या छोट्याश्या दुनियेत आनंदित राहू शकते. ह्या व्यसनाचा दुष्परिणाम मानसिक असंतूलन अनिद्रा , बैचेनि आणी स्मरणशक्ति कमी होते . 2) झोप येण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या --- कमी आणि मध्यम प्रभावी अशा 'बारर्बिचुरेट' आणि 'डायजिपाम' या गोळ्यांनी सर्वसामान्यतः झोप येत नाही तर ह्या गोळ्यांनी मेंदूवर विपरित परिणाम होतो .झोपेसाठी Valium आणि calmpose ह्या जगातील सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गोळ्या आहेत .
3) मोरफिन आणि हेरोइन --- आधुनिक काळातील तीव्र वेदनाशामक आणि तीव्र झोप आणि गुंगीत ठेवणारा मादक पदार्थ .हेरोइन मोरोफिन पेक्षा अधिक प्रमाणात प्रभावशाली आहे. पैथिडीन मोरफिन सारखाच प्रभावी आहे . ब्राऊन शुगर मिश्रित हेरोइन हा जास्त विस्तारित झालेले व्यसन आहे . ह्या तीव्र प्रभावशाली व्यसनात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढणे अत्यंत कठीण असते . ह्या व्यसनाची तलप इतकी तीव्र असते की ती व्यक्ती गुन्हेगारीच्या कोणत्याही थराला जाऊ शकते.
4) दारू आणि तंबाखू , सिगारेट ---- ड्रग्ज ब्राऊन शुगर सारखे पदार्थ खुलेआम विक्री होत नाही कारण सरकारची त्यावर बंदी आहे . त्या विरुध्द कडक कायदा आहे . पण दारू ,तंबाखू , सिगारेट या सारख्या नशिली पदार्थाच्या विक्रीने सरकारला भरमसाठ कर मिळतो. त्यामुळे दारू, सिगारेट ,तंबाखू विक्रीवर बंदी नाही त्यामुळे हे सहज उपलब्ध होतात. या पदार्थांच्या विळख्यात सापडलेली व्यक्ती स्वतःचे आयुष्य तर उध्वस्त करतेच पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला देखील दुःखाच्या खाईत टाकते .दारूच्या व्यसनापायी अनेक कुटुंब आज उध्वस्त झालेली आहेत. दारु ची तलप पुर्ण करण्यासाठी व्यसनी घरदार सुध्दा गहान ठेवतो . दारूचा दुष्परिणाम लिव्हर वर , किडनी वर आणि ह्रदयावर सुध्दा होतो . मेंदूची आकलन शक्ती कमी होते . मेंदू विचार करणे कमी करतो . व्यसनी व्यक्तीच्या डोक्यात सतत व्यसनांनचेच संकल्प चालत असतात.
5) मोबाईल आणि इंटरनेटचे व्यसन --- हे व्यसन सुध्दा दारु इतकेच घातक . आजकाल आपण पाहतो अगदी 3ते 4 वयोगटातील मुलं सुध्दा अँड्रॉइड मोबाईल सहज हाताळतात त्याला सहज ओपन करून गेम्स डाऊनलोड करून आणि सारा दिवस तहान भूक हरपून गेम्स खेळण्यात मग्न असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याचे व्यसन जडलेले आहे . मोबाईल इंटरनेट जेव्हढे उपयोगी तेव्हढेच आरोग्यासाठी घातक आहे याचा अति प्रमाणात वापराने डोळ्यांवर , मोबाईल आणि इंटरनेट मुळे मैदानी खेळ कमी झाले त्यामुळे शरीराचा व्यायाम होत नाही वजन वाढते असे विपरीत परिणाम होतात .
6) एम्फेटमाइन ... वर आपण सर्वांनी जी व्यसने पाहिलीत ती सर्व गुंगी आणि झोप आणणारे आहेत . पण एम्फेटमाइन ह्या गोळ्यांच्या व्यसनाने निद्रानाश होण्यासाठी च ह्या गोळ्या घेतल्या जातात . विद्यार्थी वर्ग आणि ज्या कर्मचाऱ्यांना रात्री जागून काम करावे लागते अशी लोकं ह्या गोळ्या घेतात . पण कालांतराने ह्या गोळ्यांची सवय होऊन जाते . परिणामतः ती व्यक्ती अतिआत्मविश्वासी होते . त्या व्यक्तीच्या मनावर ताबा राहत नाही व त्याने मांडलेला मुद्दा तो दूसर्याना समजू शकत नाही . त्या व्यक्तीला काय सांगायचे आहेच कोणाला कळत नाही परिणामतः ती व्यक्ती वेडी होते. म्हणून परिक्षेच्या काळात सुध्दा ह्या गोळ्या कोणी ही घेऊ नयेत .
7) जुगार रेस आणि सट्टा .... लवकर श्रीमंत होण्याच्या नदापायी अनेक जणांना हेव्यसन जडलेले असते . ह्या व्यसनापायी माणूस घरदाराला विकून संपूर्ण कंगाल होत असतो .
आपण पाहिलेत वरील सारेच व्यसने मानवास दुर्गति कडे घेऊन जातात . आजच्या काळात केवळ पुरूषवर्गच नाही तर स्रीयां सुध्दा व्यसनांना बळी पडलेल्या आहेत . गरोदर काळात दारू पिणे सिगारेट ओढणे गर्भावर विपरित परिणामकारक ठरू शकते . बाळ व्यंग घेऊन जन्माला येते किंवा मतिमंद होऊन जन्माला येत असते.
व्यसन नावाचा राक्षस त्या व्यक्तीला हळूहळू मानसिकरित्या दुर्बल बनवतोच आणि त्याचे शरीर सुद्धा आतून हळूळू पोखरत असतो . त्या व्यक्तीला मृत्यूच्या शय्येवर झोपवल्या शिवाय त्या राक्षसाला चैन पडत नाही .
आईवडील आपल्या मुलांबद्दल फार जास्त प्रमाणात अश्वस्त असतात त्यांना आपल्या मुलावर 100% भरवसा असतो व आमचा मुलगा किंवा मुलगी कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. पण आजकाल चे तरूण मुलं सूर्वातीला फँशन म्हणून आणि स्टेटस् म्हणून दारु ,ड्रग्ज घेतात घरी पालकांना हे माहीत नसते .जेव्हा माहीत होते तेव्हा खुप उशीर झालेला असतो . मुलं हातातून निसटून गेलेली असतात ते पालकांचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात . आणि आपले संपूर्ण जीवन उध्वस्त करतात . आपण पाहतो व्यसनी माणसाला समाजात आणि घरात काही किंमत नसते . त्याची फक्त मनधरणी म्हणून तोंडावर स्तूती केली जाते पण माघारी मात्र त्याची निंदानालस्ती केली जाते . कोणालाही व्यसनी माणुस आपल्या कोणत्याही समारंभात नको असतो . ह्याचा त्या व्यसनाधिन व्यक्तीच्या मनावर जास्तच परिणाम होतो .व तो व्यसनाच्या डोहातून बाहेर येण्याऐवजी आणखी खोलवर बुडत जातो . खरंतर अशा व्यक्तींना अधिक सात्वनाची आणि प्रेमाची खुप गरज असते . गरज असते त्यांना समजून घेण्याची . गरज असते त्यांच्या मनात खोलवर जाऊन मनातील चालू असलेले विचारांचे अविचारांच्या युध्दा चे कारण जाणून घेण्याची . त्यांना सकारात्मक दृष्टिकोन देण्याची . लागलेले कोणतेही व्यसन लगेच एका दिवसात सुटत नाही त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी पेशन्स ठेवणे गरजेचे असते व्यसनी व्यक्तीला सतत सकारात्मक विचार देणे गरजेचे असते .
राजयोग मेडिटेशन शिकून त्या सकारात्मक दिशेने जाऊन . त्या व्यक्तीला मानसिक बळ देणे खुप गरजेचे आहे .
✒ सौ .सुवर्णा सोनवणे .
7744880087
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा