मुक्तांगण
आज बकुळीची फुले पाहिलीत आणि तुझी आठवण आली . तसं पाहिलं तर बकुळीच्या फुलांचा आणि तुझा प्रत्यक्ष काही संबंध नाही. पण तुझंआणि माझं नातं आहे या बकुळीच्या फुलासारखं कितीही जुनं झालं तरी त्याची दरवळ माझ्या भोवताली अजूनही आहे . बकुळीची फुले मला फार आवडतात कारण त्या सुकलेल्या फुलांचा सुगंधाची दरवळ कायम असते . पण ती फुले मला आता कुठं मिळत नाही . असं आहे माझं जे आवडतं ते कधी मिळत नाही . तसंच तुझं माझं प्रेम जुळून न जुळणारे . तु माझा नव्हताच रे कधीच !तू कालही माझ्या जवळ नव्हताच आणि आजही नाही आहे . फक्त दोन शब्दांचा तुटका संवाद एवढीच ओळख आपल्या नात्याची . मी एकटीच आहे कायम काल ही आणि आजही. तू जेव्हा माझ्यात गुंतत गेला . पण , तुझ्या मनात भिती कायम समाजाची . पण , एक ओढ मनाची तुझी आणि माझी कळत नाही ,तुलाही आणि मलाही . मन वेड्यासारखं का तुझ्याच भोवती पिंगा घालत असतं ? तु खूपदा पाठ फिरवून गेलास ही , मला टाळून पण , मनाने नाही ऐकलं तुझं आणि पुन्हा संवादातून जवळ आलास . सहन नाही होत ना दूरावा , मग का छळतोस असा स्वत:ला आणि मला ही . एक पवित्र नातं , जगा...