पोस्ट्स

मुक्तांगण

इमेज
आज बकुळीची फुले पाहिलीत आणि तुझी आठवण आली . तसं पाहिलं तर बकुळीच्या फुलांचा आणि तुझा प्रत्यक्ष काही संबंध नाही. पण तुझंआणि माझं नातं आहे  या बकुळीच्या फुलासारखं कितीही जुनं झालं तरी त्याची दरवळ माझ्या भोवताली अजूनही आहे . बकुळीची फुले मला फार आवडतात कारण त्या सुकलेल्या फुलांचा सुगंधाची दरवळ कायम असते . पण ती फुले मला आता कुठं मिळत नाही . असं आहे माझं जे आवडतं ते कधी मिळत नाही . तसंच तुझं माझं प्रेम जुळून न जुळणारे .  तु माझा नव्हताच रे कधीच !तू कालही माझ्या जवळ नव्हताच आणि आजही नाही आहे . फक्त दोन शब्दांचा तुटका संवाद एवढीच ओळख आपल्या नात्याची  . मी एकटीच आहे कायम काल ही आणि आजही.   तू जेव्हा माझ्यात गुंतत गेला . पण , तुझ्या मनात भिती कायम समाजाची .   पण , एक ओढ मनाची तुझी आणि माझी कळत नाही ,तुलाही आणि मलाही . मन वेड्यासारखं का तुझ्याच भोवती पिंगा घालत असतं ?  तु खूपदा पाठ फिरवून गेलास ही , मला टाळून पण , मनाने नाही ऐकलं तुझं आणि पुन्हा संवादातून जवळ आलास . सहन नाही होत ना दूरावा , मग का छळतोस असा स्वत:ला आणि मला ही .  एक पवित्र नातं , जगा...

मी बदलेल तरच जग बदलेल नवा संकल्प

वातावरणातील गारठा थोडा वाढलेला जाणवत होता. सकाळी हातात वाफाळलेला चहाचा कप घेऊन सोफ्यावर बसली सहज भिंतीवर असलेल्या कॅलेंडर कडे माझे लक्ष गेले. आपण आता शेवटच्या आठवड्यात आहोत. हे वर्ष तसं प्रत्येकाचे संघर्ष करण्यातच गेले.‌ जो तो आपला जीव मुठीत धरून एक एक दिवस पुढे ढकलत होता. ह्या वर्षात प्रत्येक जण हेच शिकला जीवन आहे तर संपत्ती आहे. नाही तर सगळंच बेकार आहे. माझी माणसं हीच माझी खरी संपत्ती. पण माझी ही संपत्ती माझ्यासाठी अनमोल असलेली ही संपत्ती खरंच मी मनापासून जपते का कि नुसतं निभावावं लागतं म्हणुन निभावत आहे.  तसं असेल तर विचार करण्याची गरज आहे. आपण आता वर्षाअखेरच्या  उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत. दोन तीन दिवसांनी भिंतीवरचे कॅलेंडर बदलेल. पण मी आणि माझे विचार बदलतील का ? की नवीन वर्षात ते तसेच राहतील. प्रत्येक जण हाच विचार करतो समोरची व्यक्ती बदलेल तरच मी बदलेल. सर्वजण हाच विचार मनात ठेवून समोरच्या व्यक्तीला गॄहित धरत असतात. असं गृहीत धरून प्रत्येक नाते संबंधाची दोरी आता नाजुक झाली आहे.     आकाशात रोज सुर्य उगवतो आणि मावळतो. त्याच्या उगवल्याने दिवस सुरू होतो आणि स...

ललित मुक्तांगण

'पुसलेलं कुंकू ' शापित जीवन सायंकाळची वेळ होती .मी घरात एकटीच होते .पहाटेच्या ट्रेन नी मुंबईला जायचे म्हणून तयारी करीत होते . पती आजच दुपारी पुण्याला गेले होते . घरात आम्ही दोघेच जण असल्याने मला पहाटे साडेतीन वाजता स्टेशनवर कोण नेऊन सोडेल हा एक मोठा प्रश्न माझ्यासमोर होता . एकटं कसं जायचं स्टेशनवर ह्या विचाराने माझ्या मनांत असंख्य विचारांचे काहूर माजले होते . आमचं छोटंसं शहर त्यात एकही कंपनी नाही . औद्योगिक क्षेत्र नसल्याने तिथे रात्री रस्त्यांवर निरव शांतता पसरली असते . सकाळी पाच नंतर फिरायला जाणार्यांची किरकोळ वर्दळ दिसूं लागते . माझी ट्रेन पहाटे चार ची होती म्हणून मला घरातून पहाटे साडेतीनला च बाहेर पडावे लागणार होते .  काय करावे सुचत नव्हते . मी सहज आमच्या शेजारच्या ताईं जवळ  माझ्या मनांत उठलेले असंख्य विचारांचे काहूर त्यांना  सांगितले . शेजारच्या ताई पतीच्या निधनानंतर त्यांच्या आई बरोबर राहत होत्या . पतीचे निधन झाले तेव्हा त्यांची मुले लहान होती . पतीच्या मागे त्यांनी मुलांचे शिक्षण केले त्यांचे लग्न लावून दिले . हे सर्व करीत असताना त्यांच्या समोर अनेक समस्या...

वैचारिक चिंतन

व्यसनाधीनता ---- मृत्यु चे प्रवेशद्वार ! 'सुख केवढं केवढं जसा राईचा दाना , दुःख केवढं केवढं त्यात आभाळ मावेना'. कवितेच्या ह्या ओळी खरोखरच आजच्या समाजातील  परिस्थितीची जाणीव ...

सुन्या सुन्या अंगणात

ु         सकाळचे सहा वाजले होते . सुमित्रा घाई घाईत निघाली . तितक्यात मागून आवा ज आला सुमा सावकाश हो , आई ,"उशीर होतोय समीर गाडील जाऊन बसलेत ". असं म्हणत तीने खांद्यावर पर्स अडकवल...

वैचारिक लेख

सांजवेळ आयुष्याची  एकदा रेल्वेतून प्रवास करत असतांना  . माझे सहज लक्ष चार वर्षाच्या लहान मुलाकडे गेले  मुलगा खुप गोंडस होता . त्याचे आई वडील बाजूच्या सिटवर बसलेले होते ...