काव्य मुक्तांगण
निर्मळ प्रेम
नाही आढेवेढे नाही स्वार्थ जेथे
मनामनात फुलते मैत्रीचे नाते तेथे
मैत्रीत गंध नर्मळ प्रेमाचा दरवळतो
जेव्हा श्याम भेटीसाठी राधा वेडावते
ह्रदयातील नाती मैत्रीच्या बागेत फुलतात
जेव्हा श्याम सुदामा भेटीसाठी आतुरतात
श्याम होऊन भुकेला सुदामाचे पोहे खातो
मैत्रीची आठवण सार्यांना देऊन जातात
✍ सौ सुवर्णा सोनवणे .
चाळीसगाव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा