वैचारिक लेख


🍂प्रभावी संभाषण एक कला
➖➖➖➖➖➖➖➖🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
मनातील भाव भावना  व्यक्त करण्यासाठी आपण सर्वचजण एकमेकांशी संवाद साधत असतो ...
संभाषण कौशल्य हे प्रत्येकाजवळ कमी जास्त प्रमाणात असतचे . संवाद हे विविध प्रकारचे असतात ....
जसे साहित्यिक लेखणीच्या माध्यमातून संवाद साधतात .. मुकबधीर व्यक्ती हावभाव म्हणजे देहबोलीद्वारे संभाषण साधत असतात .., आणि संभाषणाचा मुख्य प्रकार जो आपण सर्वांच्याच परिचयाचा आहे तो म्हणजे बोली भाषेत साधलेला संवाद .
जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा सर्वात आधी त्या मूलाला स्पर्शाची भाषा समजायला लागते ...लहान मुलं हाताचा स्पर्श ओळखतात .. म्हणुन मुलं ठराविकच व्यक्तींच्या जवळ चांगले खेळतात ... ९ महिन्यांनंतर मुलं चेहरे ओळखायला लागतात . २-३ महिन्यांच्या  मुलांना आपल्या आईचा स्पर्श ओळखीचा असतो . म्हणून आईजवळ मूल लगेच रडायचे थांबते .
तिथूनच आपण स्पर्शाची भाषा शिकत असतो .
मुक्या प्राण्यांना सुध्दा स्पर्शाची भाषा कळत असते ...गाय सुध्दा ओळखीच्या हातांनाच दूध काढू देते ..कारण आपण कळत नकळत स्पर्शाच्या माध्यमातून मुक्या प्राण्यांशी संवाद साधत असतो ....
आपले संभाषण दोन प्रकारे समोरच्या व्यक्तीवर एक तर चांगला प्रभाव टाकत असते किंवा वाईट प्रभाव टाकत असते .
आपण पहातो प्रेमळ भाषेतील संभाषण विद्यार्थ्यांना आकर्षित करत असते ... प्रत्येक शाळेत विद्यार्यांचे काही ठराविक शिक्षक आवडते असतात ...त्यांचा तासांची ते आतुरतेने वाट पाहत असतात ...याला कारण त्या शिक्षकांचे प्रभावशाली आणी प्रेमळ संभाषण ! एक संभाषण असते आपले मत किंवा आपल्या भावना समोरच्याला पटवून देणं आणि दुसरे असते कोणी दुसर्या व्यक्तीने लिहलेले इतरांना पटवून देणं ...
आपण दोन्ही प्रकारच्या संभाषणात एक लेखणीचा आणि दुसरा वकृत्वाचा वापर करीत असतो .. फार पूर्वी फोनची सुविधा नव्हती तेव्हा आपण दूर गावी असलेल्या व्यक्तींशी पत्र्याच्या माध्यमातून संवाद साधत असत . एक संभाषण असते व्यवहारिक जे आपण नोकरी उद्योग धंद्या वापरत असतो .
त्यासाठी आपण पुस्तकी ज्ञानाचा वापर करत असतो . तिथं आपलं संभाषण प्रभूत्व दाखविण्यासाठी ज्ञानाची कसोटी लाविते असतो ...
आणि दूसरे संभाषण असते नात्यासाठी आणि मित्र परिवारासाठी ....तिथं संभाषण साधतांना जीवन शाळेतील शिक्षण प्रभावशाली ठरत असते ...
सुशिक्षित व्यक्ती एखाद्या सभेत बोलतो तेव्हा त्यांच्या भाषणात शिक्षणाच्या आधारे तो आपले मत प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो ..याचा अर्थ असा नाही की अशिक्षित व्यक्ती आपले म्हणने एखाद्या सभेत प्रभावीपणे मांडू शकत नाही . अशिक्षित व्यक्तीही त्यांच्या अनुभवाचा आणि सामान्य ज्ञानाच्या आधारे आपल्या प्रभावी संभाषण कौशल्याने सभा प्रभावित करून दाखवित असतो ... 
याचे सध्याचे उदाहरण म्हणजे सिंधु ताई सपकाळ ..
देशातच नव्हे तर विदेशातही आपल्या संभाषण कौशल्याचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे .
स्वातंत्र्यपुर्वीच्या काळात ..लोकमान्य टिळकांनी  आपले प्रभावी मत वृत्तपत्रांच्या माध्यमातून  लोकांसमोर मांडले ... गांधीजींनी अहिंसेचा मार्ग त्यांच्या संभाषण कलेतून लोकांना पटवून दिला...
त्याच प्रमाणे स्वामी विवेकानंद, गौतम बुद्ध ह्यांनी आत्मिक ज्ञान आपल्या संभाषण कलेतून लोकांसमोर मांडले ... भगवंत आणि अर्जुनाच्या संवादातून श्रीमतभगवत् गीतेचा जन्म झाला ....प्रत्येक संभाषण एक चांगली किंवा वाईट आठवण मागे ठेवून जाते..
काही संभाषणे जीवन बदलून टाकतात तर काही जीवन बिघडवून टाकतात ..
'शब्दच तलवारीची धार बनुन वार करतात , ही धार एकतर मनाला जखमी करते किंवा मनाला प्रेमाचा ओलावा देत असते ..
     शब्दच घडवितात नाती !
शब्दच देतात माया !
शब्दच बनतात भिंती !
शब्दच करत असतात आयुष्याची माती !!!
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂✍🏻सौ . सुवर्णा सोनवणे , चाळीसगाव
७७४४८८००८७
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा