काव्य मुक्तांगण
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
शीर्षक ➖
अमर तुझी कहाणी
➖➖➖➖➖➖➖➖
तु भारतीय नारी ! अमर तुझी कहाणी !!
तु मुर्ती त्यागाची ! तु मुर्ती प्रेमाची !!
आजही गातीं गाथां ! तुझ्या पवित्र चारित्र्याची !!धृ!!
तुच होऊन राधा ! तुच होऊन मीरा !!
दिला संदेश प्रेमाचा ! अवघ्या या विश्वांसी !!
आजही रंगती जन ! तुझ्या आठवांच्या रंगी !!
आजही गातीं गाथां ! तुझ्या पवित्र चारित्र्याची !!धृ!!
तूं होऊन लक्ष्मीबाई ! घेतलीं तलवार हाती !!
तूं होऊन जिजाबाई ! घडविले वीर शिवछत्रपती !!
आजही रंगती जन ! तुझ्या आठवांच्या रंगी!!
आजही गाती गाथां! तुझ्या पवित्र चारित्र्याची!!धृ!!
तु होऊन सीता ! तु होऊन पद्मिनी !!
दिलीं देहं आहुती !कंपली ती धरणी !!
आजही गाती गाथा ! तुझ्या पवित्र चारित्र्याची!!धृ!!
धन्य भारत भूमी! धन्य भारतीय नारी!
अमर तुझी कहाणी ! अमर तुझी कहाणी !!
🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂©✍🏻 सौ . सुवर्णा सोनवणे.
चाळीसगाव .
➖➖➖➖➖➖➖➖
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा