वैचारिक लेख
➖स्वावलंबी जीवन
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
"आकाशी झेप घेरे पाखरां
सोडी सोन्याच्या पिंजरा"!
आकाशत मुक्त उडणारऱ्या पक्षाप्रमाणे आपण मुक्त जीवन जगु शकत नाही कारण आपण स्वतःला परावलंबी बनवून ठेवले आहे. लहानसहान बाबींवर दुसऱ्यांवर विसंबून रहाण्याची आपणाला सवय झालेली आहे .
हे परावलंबी जीवन कितीही आरामदायी असले तरी ते 'सोन्याच्या पिंजराच 'आहे.
जेव्हा आपल्याला काही हवं असत तेव्हा आपल्याला एक तर साधनांवर नाहीतर एखाद्या व्यक्तीवर विसंबून रहावें लागते .
आपण आळशी बनलोय याची खबर सुध्दा आपल्याला नसते आणि जेव्हा आपल्याला आपल्याच आळशीपणाची जाणीव होते तेव्हा खुप उशीर झालेला असतो. ती व्यक्ती कधी दुर्गुणांनी घेरली जाते हे तिचे तिलाच कळत नाही.
नऊ महिन्याचं बालक जेव्हा पहिल्यांदा हात सोडून चालू लागते धावू लागते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसतो.
हीच त्या बालकाची स्वालंबी जीवनाची पहीली पायरी. नंतर ते बालक मोठे होत जाते .स्वावलंबी जीवनाचे धडे इथून पूढे सुरू होतात.
मूलगी असेल तर स्वालंबनाचे धडे तिला जास्त दिले जातात. घरातील प्रत्येकजण तिला पाऊलोपावली सांगत असतात, तु किती ही शिक्षण घेतले कितीही मोठ्या पदावर बसली तरीही स्वतःची कामे स्वतः करायला हवीत तेच तुझ्या कामी येईल आणि ती घरातील सर्व कामे शिकून घेते आणि खऱ्या अर्थाने ती स्वावलंबी बनते. आजच्या काळातील एक सुशिक्षित स्री कधीही परावलंबी असू शकत नाही .
घरात कितीही नोकरचाकर असो तिला तिच्या हाताने जेवण बनवून खाऊ घालायला नेहमीच आवडते. ती नेहमीच घरातील आणि बाहेरील जबाबदाऱ्या अगदी सहज निभावू शकते. त्यासाठी तिची एकच ईच्छा असते कि घरातील सर्वांनी तिला समजून घेतले पाहिजे. या उलट मुलांचे असते. मूलांना कधीही लहानपणी सांगितले जात नाही कि तु स्वतःचे काम स्वतः करत जा तूला पुढे उपयोगात येईल. त्यांना जास्त शिक्षणावर भर द्यायला सांगितले जाते आणि मोठी होतात. नंतर त्यांना बाकी सर्व गोष्टींसाठी स्रीवर अवलंबून राहवे लागते. जर लहानपणीच मुलांना स्वावलंबनाचे धडे मुलीप्रमाणे दिले तर आजच्या धकाधकीच्या जीवनात घर आणि ऑफिस सांभाळतांना स्रीची जी दमछाक होते ती फार कमी होईल आणी वैवाहिक जीवन कंटाळवाने रूटीन न राहता प्रेम आणि आत्मसन्मान एकमेकांना आनंदाने देता घेता येईल .
आजकालच्या युवा पिढीला दुसऱ्यांच्या भरवशावर विसंबून रहायची सवय जडलीय.
त्यांची शालेय लेखनी सुध्दा परावलंबी बनली आहे. साध्यासुध्या छोट्या छोट्या नोट्स सुध्दा ते स्वतः अभ्यासून काढू शकत नाहीत .त्यासाठी त्यांना एक तर साधनांचा आधार घ्यावा लागतो नाहीतर दुसऱ्यांची कॉपी करावी लागते. वर्गात आता एखाद दोन विद्यार्थी स्व अध्ययनाने नोट्स लिहताना दिसून येतात. युवा पिढीचा आत्मविश्वास फार कमी होत चाललाय.
कारण अभ्यासु वृत्ती कमी झालीय. कारण स्वावलंबनाचे पाठ देणारे आणि घेणारे कमी झालेत. स्वबळावर स्वतःचे विश्व निर्माण करणारे व्यक्ती नेहमीच महान आणि आदर्श असतात स्वतःच्या नजरेत आणि इतरांच्या नजरेत..
चला मग आपण स्वावलंबी पिढी घडवू या. मुलगा असो वा मुलगी दोघांना स्वालंबना चे समान धडे देऊन आदर्श भारत घडवू या.
सुरूवात आधी स्वतःपासून करू या.
सुवर्णा सोनवणे, चाळीसगांव
7744880087
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा