काव्य मुक्तांगण
बळीराजाची कहाणी
काळ्या मातीचं लेकरू मी बळीराजा
मोकळं आभाळ बाप माझा ..
धनधान्याचा मी राजा .!!
रात्रंदिन कष्ट करुनी
पिकवितो हिरे मोती ..
लाख मोलाचं धन
पिकवून देतो तुम्हाला ...
पोट भरण्यापुरता द्या !मोबदला आमच्या धनाला.!!
वाट पाहती लेकरं
गेला बाबा बाजाराला
आणील संगे तेलमीठ रांधायला ..
पोट भरण्यापुरता द्या मोबदला आमच्या धनाला.!!
बिछान्याला खिळली आई
दारा कडे टक लावून पाही ...
आणेल आज दवा माझी
गेलाय लेक बाजाराला ..
पोट भरण्यापूरता द्या मोबदला आमच्या धनाला ..!!
✍🏻 सौ सुवर्णा सोनवणे ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा