वैचारिक लेख

महाशिवरात्री ...एक पावन पर्व !

आपल्या देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी होते. अगदी लहान खेड्यातील लहानात लहान मंदिरांमध्ये शिव दर्शनासाठी गर्दी आपल्याला पहायला मिळते. संपूर्ण भारत देशात असे एकही गाव आपल्याला पहायला मिळणार नाही जिथे एकही शिवमंदिर नाही. प्रत्येक गावात एक तरी शिवमंदिर असतेच. महादेव शिव सर्वांनाच प्रिय देवता आहे. भगवान शिवची महीमा अगाध आहे. अनंत आहे. तो देवांचा देव महादेव आहे. अशी सर्वत्र मान्यता आहे. अशी अख्यायिका आहे , भगवान शिव जितका तापट आहे तितकाच भोळा आहे आणि रागवला तर तिसरा नेत्र उघडून संपूर्ण विश्र्वाला भस्मसात करेल नाही तर आईपेक्षा जास्त प्रेम देईल. 

शिवपुराण या ग्रंथात असे लिहिले आहे, महादेवाला साधे बेलाचे पान जरी दिले रे तरी तो प्रसन्न होतो. नुसते शिव शिव केले तरी तो प्रसन्न होतो. 'ॐ नमः शिवाय' हा मंत्र जप केल्याने सर्व पापांचा नाश होतो ..मुक्ती मिळते , दुःख दूर होते इ.

आता आपण जाणुन घेऊ शिव लिंगाचे खरे स्वरुप !  

भारतात महादेवाची पिंडी स्वरुपात अर्थात लिंग स्वरुपात पूजा केली जाते .. भारतात महादेवाची बारा तिर्थस्थाने प्रसिद्ध आहेत त्यांना आपण 'बारा ज्योतिर्लिंग ' या नावाने ओळखतो.

भगवान महादेवाची पूजा आपण शिवलिंग स्वरुपात सर्वच करतो. पण शिवलिंगाचा कित्येक ठिकाणी गलिच्छ आणि भ्रमित करणारा असा अर्थ काढला गेला आहे.

शिवभगवंताची पूजा प्राचिन काळापासून सर्व मान्य आहे . हे सर्वत्र स्पष्ट आहे की शिवलिंगाला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो . आपण कधी ॐ शंकराय नमः म्हणतो का आपण फक्त ॐ नमः शिवाय असेच म्हणतो . म्हणजे आपण मुर्ती स्वरुपात पुजा करत नाही . आपण शिवाची पुजा फक्त लिंग स्वरूपातच करतो.

शिव आहे कल्याणकारी आणि शंकर विनाशकारी असे दोन भिन्न भिन्न तत्त्व आहेत . 

आता आपण जाणुन घेऊ शिव ज्योतिर्लिंग चा मुळ अर्थ शिव म्हणजे कल्याणकारी आणि ज्योतिर्लिंग म्हणजे ज्योती सम प्रकाशमान तेजस्वी  ज्योतीसारखा आकार असलेला . ज्योतिर्लिंग.  "जो ज्योती प्रमाणे तेजस्वी प्रकाश स्वरुप असा देवाधिदेव महादेव"! 

काही ठिकाणी 'लिंग' या शब्दाचा योनी म्हणून संबोधले जाते ..ते साफ चुकीचे आहे . काहींच्या  मनात शिवलिंगाला पुरुषी 'जनर्नेंद्रीय' असा भ्रम निर्माण झालेला आहे . हे साफ चुकीचे आहे..  

तसे पाहिले तर संस्कृत मध्ये 'लिंग' या शब्दाचा समानार्थी  शब्द -प्रतीक - चिन्हं- निशाणी .

हे अर्थ सापडतात . पुरुषी जननेंद्रियाला संस्कृत भाषेत 'शिशिन' म्हणतात.

आता थोडे व्याकरण पाहू.

लिंग हा शब्द जातिवाचक नाम किंवा सर्वनाम शब्द दर्शविण्यासाठी वापरतात  उदा. स्त्री लिंग , पु लिंग, नपुंसक लिंग. याचाच अर्थ 'शिवलिंग' म्हणजे शिवाचे प्रतीक आणि 'ज्योतिर्लिंग' म्हणजे ज्योतीचे प्रतीक हे स्पष्ट होते . ज्याप्रमाणे इतर देवतांची मुर्ती स्वरुपात पुजा होते त्याप्रमाणे महादेव शिवाची लिंग स्वरूपातच पुजा होते .

शिव एक तत्त्व आहे . एक ऊर्जास्त्रोत आहे . जी ऊर्जा प्रकाश स्वरुपात अस्तित्वात आहे .. ध्यानाच्या अंत:गाभार्यात  शिरुन त्या ऊर्जेचा अनुभव घेता येतो . आणि ज्ञानाचा साक्षात्कार होतो आपण मोठे मोठे महान विद्वान पंडितांचे आत्मचरित्र जर पाहिले तर त्यात स्वामि विवेकानंद , गौतम बुद्ध ,संत ज्ञानेश्वर , रामकृष्ण परमहंस या सर्वांना तेजोमय ज्योतीचा साक्षात्कार झालेल्याची नोंद आपणास आढळते. ईश्र्वराचे मुळ रुप ज्योती स्वरुप आहे म्हणूनच , बर्याच ज्योतिर्लिंगांची नावे जसे , सोमेश्वर, घृश्णेश्वर, त्र्यंबकेश्वर , महाबळेश्वर, महाकालेश्वर , काशी विश्वेश्वर, ,रामेश्र्वर इ.

स्कंद पुराणात शिव म्हणजे शून्य,अनंत ज्याला ना आदि ना अंत असा तो अनंत . असा अर्थ दिलेला आहे . शिव निराकार ज्योती आहे  म्हणून निराकाराचे प्रतीक म्हणजे 'ज्योतीर्लिंग' !

ब्रह्माण्डात दोनच वस्तू  आहे . एक ऊर्जा आणि पदार्थ. आपले शरीर पदार्थांने (पाच तत्वाने) बनलेले आहे . शरीराला चालविणारी ऊर्जा म्हणजे आत्मा.  त्याचप्रमाणे ब्रह्माण्डाला बळ देणारी ऊर्जा शक्ती म्हणजे शिव

शिव म्हणजे सदाकल्याणकारी म्हणूनच शिवाचे एक नाव सदाशिव आहे .

शिव ज्योतिर्लिंग कल्याणकारी ऊर्जा(शिव) आणि शक्तीचे एकत्रित प्रतीक आहे

म्हणजेच पुरुष आणि प्रकृती  समानतेचे प्रतिक आहे . शिव आणि शक्ति चे एकत्रित प्रतीक म्हणजे 'ज्योतीर्लिंग' .!

आता आपण 'योनी' या शब्दाचा विचार करु .. गरूड पुराणात चार प्रकारच्या योनी दर्शविलेल्या आहेत .१) मनुष्य योनी २)पशू योनी ३) वृक्ष योनी ४) स्थूल योनी

'योनी' या शब्दाचा समानार्थी शब्द प्रकटीकरण असा आहे . गरुड पुराणानुसार मनुष्य आपल्या कर्मानुसार भिन्न भिन्न योनीत जन्म घेत असतो . हिंदू धर्मातील मान्यतेनुसार ८४लक्ष योनी आहेत , आता याला विज्ञानाची ही मान्यता प्राप्त झाली आहे . पृथ्वी वर ८४ लक्ष प्रकारचे जीव अस्तित्वात आहेत , यात लहानसहान किटक सर्वांचा समावेश होतो .

म्हणून शिवलिंगाला स्री किंवा पुरुषी योनी संबोधने हे साफ चुकीचे आहे .

  फार पुर्वी पासुन  ज्योतिर्लिंगाची पुजा आपण मोठ्या भक्तिभावाने करतो . कारण त्यांचे स्वरुप ज्योतिर्मय आहे आणि आपले मुळ स्वरुपही  ज्योतिर्मय आहे. तो उच्च सर्वज्ञानी आणि सर्व गुण संपन्न आहे म्हणून आपण त्याला परमात्मा शिव म्हणतो . आपण आत्मा तो परमात्मा! 

म्हणूनच म्हणतात आत्मज्योती जागवा परमात्म्याला स्मरण करा.

   आपण सर्वच त्याची संतान आहोत .

प्रत्येक धर्मात ज्योति स्वरुपाचे ध्यान अथवा पुजन केले जाते. हिंदू लोक ज्योतिर्लिंगाची पुजा करतात, मुस्लिम लोक ज्योतिला नूर म्हणतात  त्यांचे श्रद्धा स्थान असलेल्या मक्का येथे शिवलिंगाच्या आकाराचा दगड तेथे आहे .म्हणजे तेही ज्योतिस्वरूपाचे आव्हान करतात . क्रिश्चयन धर्मीय लोक म्हणतात 'God  is divine light '. , शिख धर्मीय देखील म्हणतात एक  'ॐ कार निराकार ' याचाच अर्थ ईश्र्वर एकच आहे .कोणी त्याला लिंग स्वरूपात पुजतो तर कोणी ज्योती स्वरुपाचे ध्यान करतो ..सर्वच एकाच ईश्वराला मानतात. 
सर्वच धर्मातील लोक त्याला पुकारतांना म्हणतात
'तुम मात-पिता हम बालक तेरे , तुम्हारी कृपासे सुख घने रे'

 सौ . सुवर्णा सोनवणे 
चाळीसगाव जि. जळगाव

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ललित मुक्तांगण

सुन्या सुन्या अंगणात

वैचारिक लेख