वैचारिक लेख
* *जातीय द्वेषावर साहित्यिकांचा सहभाग कसा असावा*〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰*
________________
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि त्यातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा प्रत्येकाला अभिमान आहे यात शंकाच नाही ....
लहान लहान चिमुकल्यांचे शालेय जीवनात पदार्पण होते तेव्हा त्या बालमनाला कोणतीही जात कोणताही धर्म ठाऊक नसतो . त्या बालमनाला फक्त एकच कळत शाळेतील सर्व मित्र मैत्रीणीं सोबत एकत्र खेळायचे एकत्र सर्वांनी वाटुन डबा खायचा आणि एकत्र अभ्यास करायचा .
त्या निरागस बालपणातील निरागस मैत्री त्या मैत्रीला जातीची चौकट नसते .
समाजाने निर्माण केलेल्या जातीय वर्गवारीशी ते बालमनं अपरिचित असतं .
जेव्हा एक एक वर्ग पुढे जाऊन शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या साहित्य, ऐतिहासिक लेखनामुळे त्यांना जातं आणि धर्मांचा परिचय होतं असतो ..
त्या कोवळ्या मनावर एकता आणि एक सुत्रतेचे संस्कार निर्माण करण्याचे काम शालेय अभ्यासक्रमात आलेलं विविध प्रकारचे साहित्य करत असते . तेव्हा एक उच्च संस्कारक्षम नागरिक घडविण्यात उच्च विचारसरणी असलेल्या साहित्याचा मोठा वाटा असतो.
साहित्यिकाच्या लेखणीतून अवतरलेली उच्च विचारसरणी म्हणजे आई सरस्वती कडून मिळालेले दिव्य वरदान ...
साहित्यिकाची लेखणीत जबाबदार नागरिक घडविण्याची क्षमता असते .
आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी त्यांच्या विविध प्रकारच्या लेखनातून भारतातील विविधतेने नटलेल्या समाजाला बंधूत्वाचे एकतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम या पूर्वी अनेक जेष्ठ विचारवंत साहित्यिक यांनी आपल्या लेखनातून कलात्मक रीतीने केलेले आहे .
समाजाला एकसुत्रात बांधण्यात साहित्यिकाचा मोठा वाटा असतो.
साहित्यिकांचे साधे दोन ओळींचे लिखाण समाजात एकतर शांती निर्माण करु शकते नाहीतर अशांती निर्माण करु शकते .
जातीय व्देषाला खंत पाणी मिळेल असं कुठल्याही प्रकारचे लिखाण जबाबदार नागरिक म्हणून कुठल्याही साहित्यिकानं करु नये ..
समाजातील एकता बंधू भाव टिकवून ठेवण्यासाठी साहित्य हे लाखमोलाचे कार्य करीत असतो ..
साहित्यिक हा प्रथम एक जबाबदार नागरिक आहे आणि नंतर साहित्यिक आहे .. ते प्रत्येक साहित्यिकाने लक्षात ठेवले पाहिजे . जातिनिहाय लिखाणास प्राधान्य न देता मानवतावादी लिखाणास प्राधान्य दिले पाहिजे ...
आपले लिखाण कुठेही प्रकाशित करताना या कोणत्याही प्रकारच्या वादाला खतपाणी मिळून अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी प्रत्येक साहित्यिकाने घेतलीं पाहिजे ..
कारण चुकीच्या एका ओळीने सुध्दा अफवांचे मोठे वादळ निर्माण होऊन समाजात अनेक प्रकारचे वाद निर्माण होऊ शकतात.....
कवीच्या एका साध्याशा चारोळीमध्ये समाज परिवर्तनाची ताकत असते .
जर भारतातील विविधता आणि एकसुत्रता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक साहित्यिकाने आपली जबाबदारी ओळखून समाजात बंधुत्व निर्माण होईल असेच साहित्य निर्माण केले पाहिजे ..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖✍🏻 सुवर्णा सोनवणे
चाळीसगाव
7744880087
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा